महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी १५ एप्रिल रोजी शहरात आयुष्यमान आरोग्य शिबीर महानगरपालिकेच्या शहरातील २० आरोग्य केंद्रांवर नागरिकांसाठी सुविधा

Published on -

अहिल्यानगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हेल्थ अॅड वेलनेस सेंटरची सुरुवात १४ एप्रिल २०१८ रोजी झाली. जनतेला दर्जेदार, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमास १४ एप्रिल २०२५ रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी १५ एप्रिल रोजी शहरातील विविध आरोग्य, आयुष्यमान केंद्रात “आयुष्यमान आरोग्य शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शहरातील महानगरपालिकेचे दवाखाने, आरोग्य केंद्र अशा २० ठिकाणी शिबिर होणार आहे. या शिबीरात मधूमेह, रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग आजारावर स्क्रिनींग (तपासणी), लॅबोरेटरी तपासणी, तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन, आभाकार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, अहिल्यानगर महानगरपालिकामार्फत यांच्यामार्फत हे शिबिर होणार आहे.

महानगरपालिकेच्या नागापूर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, वैदूवाडी आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, बोल्हेगाव आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, तपोवनआयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, सिव्हील (सावेडी) आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, सिध्दार्थनगर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, ढवणवस्ती, मुकुंदनगर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, तोफखाना आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, शिवाजीनगर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महात्मा फुले आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, जिजामाता आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, संजयनगर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, सारसनगर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, त्रिमुर्ती चौक आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, केडगाव आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक केंद्र, इंदिरानगर चौक आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, भुषणनगर आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, ठुबेमळा आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी केंद्र, झेंडीगेट दवाखाना या केंद्रावर शिबिर होणार आहे. नागरिकांनी नजीकच्या परिसरातील केंद्रांवर शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News