अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पावर राजकीय क्षेत्रातून अनेक व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार पवार म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात शहरी व ग्रामीण रोजगाराबाबत युवकांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. मागील अर्थसंकल्पात रोजगारावर ९८ हजार कोटी रुपये बजेट होते चालू वर्षी ते ७८ हजार कोटी केले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/12/images_1584087724377_rohit_pawar.jpg)
तसेच देशात नऊ कोटीपेक्षाही जास्त बेरोजगार युवा वर्ग आहे यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद अत्यंत तुटपुंजी आहे. आज जामखेड तालुक्यातील काही विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात काही चांगल्या गोष्टी असतील पण आरोग्य, युवा वर्ग यांची निराशा झालेली आहे. तसेच आपला जीडीपी दोन वर्षांत फक्त दीड ते दोन टक्क्यांनीच वाढलेला आहे.
नऊ कोटी पेक्षा जास्त युवा बेरोजगार आहेत यांच्यासाठी व आरोग्यविषयक जादा तरतुदी आसावयास हव्या होत्या असे सांगितले. यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे,
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड गटप्रमुख प्रा.मधुकर राळेभात, शरद शिंदे, राजेंद्र पवार, सचिन घुमरे, चंद्रकांत गोलेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम