सॊने खरेदीच्या बहाण्याने सराफास घातला साडेतीन लाखांचा गंडा ..!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात आलेल्या एका अनोळखी इसमाने सराफ व्यावसायिकाला दागिने दाखवायला सांगितले अन त्यांना बोलण्यात गुंतवून ३ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेवून तेथून पोबारा करत, तब्बल साडेतीन लाखांना गंडा घातला. ही घटना बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथे असलेल्या दहीवळ ज्वेलर्स या सराफी दुकानात रविवारी (दि.३०) सकाळी ९.४५ च्या सुमारास घडली.

याबाबत शशिकांत भगवान दहीवळ (वय ६२, रा. सुडके मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दहीवळ यांचे
बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथे दहीवळ ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे.

रविवारी सकाळी त्यांनी दुकान उघडले व त्यातील रॅक मध्ये सोन्याचे दागिने लावत असताना ९.४५ च्या सुमारास एक काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेला इसम दुकानात आला. त्याने फिर्यादी दहीवळ यांना सोन्याचे दागिने दाखवायला सांगितले. त्यांनी त्यास विविध प्रकारचे दागिने दाखवले. ते दागिने दुकानाच्या काऊंटर ठेवलेले होते.

त्या इसमाने आणखी दागिने दाखवायला सांगितले. फिर्यादी दहीवळ हे रॅक मधून आणखी दागिने काढायला गेले असता त्या इसमाने दुकानाच्या काऊंटर
ठेवलेले ३ लाख ४८ हजार किमतीचे सोन्याचे दागिने तेथून पोबारा केला.

दहीवळ यांच्या निदर्शनास ही आल्यावर ते दुकानाच्या आले, परंतु तो पर्यंत तो तेथून पसार झाला होता. माहिती त्यांनी पोलिसांना कळविली. ही माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट पाहणी केली. या प्रकरणी दहिवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe