अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि अहमदनगर
शहर जिल्हा एन. एस. यु. आय. (विद्यार्थी काँग्रेस) च्या वतीने विद्यार्थ्यांना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बोल्हेगाव भागातील युवा नेते चिरंजीवभाऊ गाढवे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी बोलताना काळे म्हणाले की, सत्यजित तांबे यांची स्वतःची सुरुवात ही विद्यार्थी काँग्रेस मधून झालेली आहे.
त्यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यात आपली ओळख निर्माण केली होती. चिरंजीव गाढवे बोल्हेगावातील लोकप्रिय युवा नेतृत्व आहे.
त्यांचा कायम या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजन करण्यासाठी पुढाकार असतो. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी बोलताना चिरंजीवभाऊ गाढवे म्हणाले की, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये काम करत असताना आम्हाला कायमच राजकीय बळ मिळत आलेले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ७ मधील प्रश्न सोडवण्यासाठी आमचा कायम प्रयत्न राहणार आहे. सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून आम्ही बोल्हेगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण गीते, शक्तिमान खाडे, मच्छिंद्र साळुंखे, आकाश जाधव यांनी विशेष योगदान दिले.
यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दानिश शेख, राहुल कातोरे, इंद्रजित मुसमाडे, विशाल वाकचौरे, सोमनाथ हरीशचंद्रे, योगेश शिंगाडे, हर्षल भोसले आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved