चायना मांजा विक्री करणारे व्यावसायिक प्रशासनाच्या रडारवर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यामुळे आता बाजरात देखील पतंग तसेच मांजा विक्रीसाठीच उपलब्ध झाला आहे. यातच नायलॉन मंजुर बंदी असताना देखील त्याची विक्री होताना दिसत आहे.

यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरातील वेगवेगळ्या परिसरात सर्रासपणे चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे.

या पथकाने चायना मांजा जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पथकाने वेगवेगळ्या परिसरातील व्यावसायिकांकडून चायना मांजाच्या 13 आसर्‍या जप्त केल्या आहेत.

तसेच सदर पथकाकडून ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून चायना मांजाची विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी यापुढील काळात चायना मांजाची विक्री करू नये, असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान दरवर्षी चायना मांजामुळे पशु, पक्षी, मनुष्य यांना ईजा होते. कदाचित त्यांची प्राणहानी देखील होते. व दरवर्षी चायना मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना होऊन नागरिकांना,

पशु पक्षांना सदर चायना मांजाचा त्रास सहन करावा लागतो. या अनुषंगाने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नगरपरिषदेकडून चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द धडक जप्ती मोहीम राबविली जात आहे.

अद्यापपावेतो जप्ती मोहिमेत शहरातील वेगवेगळ्या परिसरातील व्यावसायिकांकडून चायना मांजाच्या 13 आसर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe