Ahmednagar News : पाथर्डी व नगर तालुक्यातील विविध गावच्या रस्त्यांच्या कामासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून ३०/५४ अंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये पाथर्डी तालुक्यातील करंजी ते दगडवाडी भोसे रस्त्याच्या कामासाठी तीस लक्ष, कामत शिंगवे रस्त्याच्या कामासाठी तीस लक्ष तर नगर तालुक्यातील बहिरवाडी गावठाण ते जगदाळे वस्ती तोडमलवस्ती रस्ता कामासाठी तीस लक्ष,
पिंपळगाव उज्जैनी ते दत्तकवाडी देवगाव ससेवाडी रस्ता तीस लक्ष, जेऊर बस स्टॅण्ड ते मगरवस्ती घोरपडेवस्ती डोंगरगण रस्त्यासाठी तीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे दळणवळणाची सोय होणार आहे. उर्वरित गावच्या रस्त्यांच्या कामासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आणखी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करून मंजूर केला जाईल,
असा विश्वास माजी मंत्री कर्डिले यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केल्याने लाभधारक गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.