Ahmednagar News : गावठी पिस्तुलसह तालुक्यातील जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याला नेवासा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई नारायण एकनाथ डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.१९) रात्री ११ वाजता देडगाव ते तेलकुडगाव जाणाऱ्या रोडवर देडगाव (ता. नेवासा) येथे आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (रा. जेऊर हैबाती, ता. नेवासा)
व सुनील दिलीप चव्हाण (गाव माहित नाही) यांनी चोरी करण्याच्या इराद्याने अथवा घातपात करण्याच्या तयारीने देडगाव ते तेलकुडगाव रोडने जात असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तुल आढळुन आला.
पोलिसांनी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याची अंगझडतीत घेतली असता त्याच्याकडे दहा लाख रूपयांसह गावठी पिस्तुलसह दोन हजाराची एक जिवंत काडतुस, (एमएच १७ एडी ७०८२) क्रमांकाची १५ हजाराची दुचाकी,
मोटारसायकल सोडुन पळुन गेलेल्या इसमाच्या ताब्यातील काळ्या रंगाची (एएच १७ जे ४४२७) क्रमांकाची १३ हजारांची दुचाकी, असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (रा. जेऊर हैबाती, ता. नेवासा) व सुनील दिलीप चव्हाण (गाव माहित नाही) याच्या विरूद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घुगे पुढील तपास करित आहेत.