ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या जळाल्या एक लाखाचे नुकसान; मोठी वित्तहानी टळली

Published on -

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे ऊस तोडणीनिमित्त वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या दोन झोपड्या बुधवारी (दि.३१) जानेवारी रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास आगीच्या जळाल्या.

त्यामुळे या कुटुंबाचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले. नागरीकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान दाखविल्यामुळे शेजारी असलेल्या १५ ते १८ झोपड्या आगीपासून बचावल्याने मोठी वित्तहानी टळली आहे.

शिबलापूर शिवारात सुनील गंगाधर बोंद्रे यांची गट नंबर १५७/१ शेती असून याठिकाणी संगमनेर कारखान्याच्या ऊस मजुरांची टोळी राहत आहे. काल बुधवारी (दि.३१) जानेवारी रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास ऊसतोड मजुर समाधान पांडुरंग पवार व अंबादास रमेश वाघ यांच्या झोपडीला आग लागली होती. यामध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले.

यावेळी समाधान पवार यांचे ६० हजार रुपये व अंबादास वाघ यांचे ५५ हजार रुपये नुकसान झाले. यावेळी नागरीकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे मोठी वित्तहानी टळली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रमोद बोंद्रे, सुनील बोंद्रे, सुरेश बोंद्रे, सुभाष नागरे, कल्पना शेजवळ, रवींद्र नांगरे आदींनी घटनास्थळी धाव घेत या कुटुंबाला धीर दिला आहे. आर्थिक हातभार देखील लावला आहे. तर घटनेचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe