Ahmednagar News : आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार

Published on -

Ahmednagar News : आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला. ऋषिकेश विष्णू फुंदे (वय १९ ) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकळी नऊ वाजण्याच्या सुमारास फुंदे टाकळी शिवारात प्रवरा माध्यमिक विद्यालयासमोर घडला.

ऋषिकेश विष्णु फुंदे हा मोटारयाकल घेऊन किराणा सामाना आणायला चालला होता. रस्त्यावर प्रशांत फुंदे भेटल्याने तो बाजुला गाडी उभी करून त्याच्याशी बोलत होता.

तेवढ्यात पाथर्डीकडून आलेला आयशर टेम्पो क्रं. (एमएच १२ एमडी ६८७) याने उभ्या असलेल्या मोटारसायकलला विरोधी दिशेला येऊन जोराची धडक दिली.

यामध्ये ऋषिकेशला गंभीर जखमी झाला. प्रशांत फुंदे याने तातडीने नातेवाईकांना बोलावुन घेतले. गंभीर जखमी ऋषिकेश फुंदे याला पाथर्डीच्या दवाखान्यात आणले.

मात्र, तेथे डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो घेऊन पसार झाला. फुंदे टाकळी ग्रामस्थांनी रस्ता अडवून तीव्र स्वरुपाच्या भावना व्यक्त करीत रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन फुंदे टाकळी येथे ऋषिकेश फुंदे वर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News