अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जयकिसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस कर्जापोटी दिलेला धनादेश ना वटल्यामुळे समीर सुलेमान सय्यद याला संगमनेरच्या न्यायालयाने १ वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे.
तसेच धनादेशाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, समीर सय्यद याने घारगाव येथील जयकिसान ग्रामीण पतसंस्थेकडून तीन लाख रुपयांचे फिक्स लोन घेतले होते.
सुरुवातीला समीरने काही रक्कम संस्थेत भरली. मात्र नंतर त्याने पैसे ना भरल्यामुळे त्याचे कर्ज अनियमित झाल्याने संस्थेने त्याच्याकडे थकीत कर्जाच्या रकमेची मागणी केली.
त्यावेळी सय्यद याने त्याचे खाते असललेल्या स्टेट बँक घारगाव शाखेतील १ लाख ३ हजार ६ रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिला. मात्र सदरचा धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे ना वटता परत गेला.
यामुळे संबंधिताने संस्थेची फसवणूक केल्याच्या कारणावरून संगमनेर येथील न्यायालयात आरोपी समीर सय्यद याला शिक्षा सुनावण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम