Onion Price Ahmednagar : नगरमध्ये कांदा लिलाव सुरळीत १ लाख ४३१ कांदा गोण्यांची आवक १३०० ते २४०० रूपये भाव

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Onion Price Ahmednagar : नगर तालुका नेप्ती कृषी उपबाजार समितीत सोमवारी झालेल्या कांदा लिलावात सुमारे १ लाख ४३१ कांदा गोण्यांची ( ५०२ विक्रमी गाड्यांची ) आवक झाली असून शेतकऱ्यांना सरासरी प्रतिकिलो १३ ते २४ रूपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे.

दरम्यान केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. नगरमध्ये देखील शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळण्यात नेप्ती कृषी उपबाजार समितीचा राज्यात नावलौकिक आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, संचालक मंडळ नेप्ती उपबाजार समितीत उभा राहून योग्य पद्धतीने नियोजन करत कांदा लिलाव सुरळीत पार पाडला. यात एक नंबरच्या कांद्याला २००० ते २४००, २ नंबर १४०० ते २०००, ३ नंबर ७०० ते १४०० ४ नंबर २०० ते ७०० असे दर मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe