कांद्याचे भाव वधारले : नगरमध्ये कांद्याला मिळाला इतका भाव

Pragati
Published:

Ahmednagar News : सॊमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३४ हजार ३६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ७०० ते ३२०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दोन रुपये पडत आहेत.

चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती.

त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ आहेत त्यांनी कांदा विक्री कारण्याऐवजी साठवणूक केला. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नव्हती त्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी सुरु आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला होता. कारण खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैसे हवे होते.

मात्र गावरान कांद्याला भाव मिळत नसल्याने तो साठवुन ठेवला होता. तो साठवणूक केलेला कांदा कधी विक्री करायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता.मात्र आता कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत.

दरम्यान सोमवारी नगरच्या बाजार समितीत ६१ हजार ८८४ गोण्यात भरून आलेल्या ३४ हजार ३६ क्विंटल कांद्याला ७०० ते ३२०० रुपये असा भाव मिळाला. यातील १ नंबरच्या कांद्याला २७०० ते ३२००, २ नंबरच्या कांद्याला २००० ते २७००, ३ नंबरच्या कांद्याला १३०० ते २०००, तर ४ नंबरच्या कांद्याला ७०० ते १३०० असा भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe