कांद्याचा भाव गडगडला; नागरिक खुश तर शेतकरी नाखूष

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते. दरम्यान दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं.

तर नागरिकांमध्ये नाखुषीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती बदलली असून आता कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरु झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे तर दुसरीकडे नागरिकांमध्ये खुशीचे वातावरण पाहायला मिळते आहे. नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव

येथील उपबाजारात आज छत्तीस हजार कांदा गोण्यांची आवक होवून क्विटंलचा भाव सहा हजारतच अडखळला आहे. मागील आठवड्यात प्रत्येक लिलावात कांद्याचा भाव एक ते तीन हजाराने कमी झाल्यानंतर आवक कमी होत गेली होती.

आज बाजारात छत्तीस हजार २६६ कांदा गोण्यांची आवक झाली होती. शेतकरी कांद्याचे भाव वाढतील म्हणून थोडा-थोडा कांदा घेवून येत आहे.

या उन्हाळी कांदा आता खराब होवू लागल्याने आहे तो भाव पदरात पाडून घ्यावा. अशा मनस्थितीत शेतकरी आला आहे. आज एक नंबर कांद्यास पाच ते साडेसहा हजाराचा भाव मिळाला.

दोन नंबर कांद्यास चार ते पाच हजार तर गोल्टी कांद्यास तीन ते साडेतीन हजार क्विटंलचा भाव मिळाला. काही मोजक्या गोण्यास सात हजाराचा भाव मिळाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!