जामखेडच्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान तातडीने द्यावे – प्रा. राम शिंदे

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आ. प्रा. राम शिंदे यांनी जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन जामखेड तालुक्यात जे साडेतीन हजार शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना तातडीने कांदा अनुदान मिळावं, अशी मागणी केली आहे.

यावेळी पणनमंत्री सत्तार यांनी तातडीने पणन उपसंचालक, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कांदा अनुदानात अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी करावी असे आदेश दिले.

आमदार शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जामखेड तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची माहिती देवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी जामखेड तालुक्यामध्ये चारा छावण्या,

पाण्याचे टँकर, पीक विमा आदींबाबत चर्चा केली व मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासित केले की दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये कर्जत जामखेडमधील जनतेच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे.

मतदारसंघांमध्ये कसलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही. यावेळी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरददादा कार्ले, संचालक सचिन घुमरे, अंकुश ढवळे, राहुल बेदमुथ्था, नंदकुमार गोरे,

डॉ. गणेश जगताप, सुरेश पवार, बबन हुलगुंडे, जहिरभाई शेख व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe