मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र केसांचे भाविकांना ऑनलाईन दर्शन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केसांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पवित्र केसांचे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन मोजक्या भाविकांची उपस्थिती होती.

तसेच इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस आहे.

यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील आस्तंबूल या गावाचा समावेश आहे. नगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत महंमद पैगंबराच्या पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे.

इराक व इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबराचे पवित्र केस आनले असून, परंपरेनुसार फक्त मोहंमद पैगंबर जयंतीच्या दिवशी हे पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्याची

माहिती पुजारी सय्यद बुर्‍हाण यांनी दिली. यावेळी मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महलला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment