संगमनेर तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बु अप्पर तहसील कार्यालयास तालुक्यातील खांडगाव अंभोरे, जाखुरी , कोळवाडे, नीमज , पिंपारणे,खराडी या गावांनी विशेष ग्रामसभा बोलून विरोध दर्शवला आहे. संगमनेर तालुक्याचे होणारे विभाजन हे तालुक्यातील जनतेला मान्य नसून अनेक गावे आता आक्रमक झाली आहे.
माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यात विकास कामांमुळे एक विशेष लौकिक प्राप्त झाला आहे. मात्र येथील अर्थव्यवस्था ही काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी संगमनेर तालुका मोडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड सुरू असून शहरालगतची अनेक गावी अश्वी बु येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात जोडली आहे. यामुळे अनेक गावे संतप्त झाली आहे.
संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी राजकीय उद्देशातून आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करून त्यामध्ये संगमनेर शहरालगतची अनेक गावे जोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी घातलेला घाट अत्यंत चुकीचा आहे.
यानंतर अनेक गावांमधील शिष्टमंडळाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला. तरी हा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशाराही या गावांनी प्रशासनाला दिला आहे.