Ahmednagar News : मुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार मीच असणार आहे, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकारांशी पुढे बोलताना खासदार लोखंडे म्हणाले, २०२३ ला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कामे केली. रखडलेली अनेक कामे मार्गी लावली असल्याचे म्हणत

मला ४० वर्षांचा राजकीय अनुभव असून मला केंद्रात साईबाबांच्या नगरीतला खासदार म्हणून ओळखतात. साई बाबांच्या नावाचा उपयोग १८२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून महायुतीकडून मात्र अजूनही ही जागा कुणाकडे, हे निश्चित झालेले नसल्याने महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.













