अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- महापालिकेने ठेकेदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत अन्यथा शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे बेमुदत बंद करण्याचा इशारा महापालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेने दिला आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली. दरम्यान मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मनपाचे नोंदणीकृत ठेकेदार व चेअरमन, मजूर सहकारी संस्थांनी दिवाळीपूर्वी वारंवार समक्ष भेटून व निवेदन देऊनही आपण आम्हाला धनादेश देण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची आतापर्यंत पूर्तता झालेली नाही. यामुळे ठेकेदार संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घेऊ
प्रत्येक ठेकेदारास दोन लाखांचे धनादेश तातडीने देण्याबाबत संबंधितास आदेश व्हावेत.
सर्वसाधारण सभा ठरावाप्रमाणे नगरसेवक स्वच्छ निधीतील देयके अदा करण्यात यावीत.
शासनाच्या मुलभूत सुविधा योजनेच्या 30 टक्के रक्कम मनपा हिस्सा तातडीने जमा करण्यात यावा
वरील मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. वरील मागण्याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास सर्व ठेकेदार मनपा हद्दीत चाललेले सर्व विकास कामे नाइलाजास्तव बंद ठेवतील असा इशारा यावेळी मनपा प्रशासनाला देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम