राष्ट्रवादी राज्यात आमचा मित्रपक्ष, मात्र सर्वत्र आमच्याशीच प्रॉब्लेम का – सत्यजित तांबे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी सायंकाळी झाला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लहामटे हे एकाच व्यासपीठावर आले होते.

तांबे यांनी भाषणात आमदार लहामटे यांना काँग्रेससंबंधी तुमची भूमिका काय, असा प्रश्न करून बोलण्यास सुरुवात केली.तसेच पुढे ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे,

मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का? आमचा नेमका मित्र कोण, हे कळत नाही,’ असा टोला तांबे यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य केलं आहे. पुढे बोलताना तांबे म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आमचा मित्रपक्ष आहे.

मात्र सर्वत्र आमच्याशीच प्रॉब्लेम का? नेमका मित्र कोण? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या काळात ते चर्चा करतील अशी अपेक्षा, असा आशावादही तांबे यांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमास अकोलेचे राष्ट्रवादी आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते.आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत.

बहुतांश नगरपंचातीच्या निवडणुकीत सर्वजण स्वतंत्र लढले आहेत. आता आगामी निवडणुकीत काय भूमिका असेल? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्यावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!