अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, यामुळे सध्या इच्छुकांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे. यातच पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल 76 अर्जांपैकी छाननी प्रक्रियेत 13 अर्ज अवैध ठरले आहे. तर 13 जागांसाठी 63 अर्ज वैध ठरले आहेत.
बाद झालेले अर्ज
प्रभाग क्रमांक 1 शीतल सुनील म्हस्के
प्रभाग क्रमांक 5 भीमा बबन औटी
प्रभाग क्रमांक 8 शंकर ताराचंद नगरे
प्रभाग क्रमांक 9 अमित हरिभाऊ जाधव
प्रभाग क्रमांक 9 विलास तुकाराम मते
प्रभाग क्रमांक 9 बाळासाहेब सुखदेव शेटे
प्रभाग क्रमांक 9 सचिन तुकाराम नगरे
प्रभाग क्रमांक 16 रायभान दिनेश औटी
प्रभाग क्रमांक 17 शारदा शिवाजी मगर
पारनेर नगर पंचायत निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी अनेक राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. 13 जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत तब्बल 76 उमेदवार रिंगणात उतरले होते.
दरम्यान आगामी निवडणूकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने 17 जागांपैकी फक्त 13 जागांवर निवडणूक होत आहे. या 13 जागांसाठी 76 अर्ज दाखल झाले होते. त्या पैकी छाननीत 13 अर्ज बाद झालेले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम