अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या हाती सभासदांनी १९८४ मध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली होती. त्यांच्या कालावधीत पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता.
स्वार्थासाठी लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे, अशी टीका नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे कारखाना निवडणुकीच्या सांगता सभेनिमित्त नागवडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आमदार पाचपुते यांना आपला खासगी कारखाना चालवता येईना, ते सहकारी कारखाना काय चालवणार.
सहकारी कारखाना हा गोरगरीब ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू आहे. त्यावरच त्यांचे प्रपंच चालत असल्याने स्व.बापूंनी आपले आयुष्य खर्ची घातले.
सभासदांच्या आशीर्वादामुळे निवडणुकीत विरोधकांना चीत करणार यात शंका नाही. हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना ताब्यात घेण्यासाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांना बापू नंतर मलाच अध्यक्ष करावे,
अशी त्यांची इच्छा होती मात्र त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नसल्याचे लक्षात आले आणि त्यातच छत्रपती कॉलेज मधील मेस मध्ये निकृष्ट जेवण देत असल्याने त्यांचे जेवणाचे टेंडर रद्द झाल्याने आणि त्यांच्या कारचे डिझेल कारखान्याच्या पैशातून बंद केल्याने याचा राग येऊन त्यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि स्वार्थासाठी पाचपुते यांच्याशी सलगी करत आण्णासाहेब शेलार,
जीजबापू शिंदे या लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले अाहेत. मगर यांनी मागील काही दिवसांपासून माझ्यावर अनेक तथ्य हिन आरोप केले आहेत. केलेल्या आरोपापैकी कोणताही एक आरोप पुराव्यासह सिद्ध करावा, असे आव्हान नागवडे यांनी यावेळी दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम