Ahmednagar News : मुलींच्या संगोपनासाठी, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये केंद्र सरकारडून माझी कन्या सुकन्या योजना सुरू आहे. तर राज्य सरकारकडून माझी कन्या, भाग्यश्री योजना सुरू आहे.
राज्याच्या माझी कन्या, भाग्यश्री योजना मार्फत अहमदनगर जिल्हा परिषद मुलींच्या पालकांना प्रत्येकी ५० हजारांचा लाभ देते. जिल्हा परिषदेने गेल्या तीन वर्षांत २४० मुलींच्या नावे पालकांना प्रत्येकी ५० हजारांचा लाभ दिलाय.
जिल्हा परिषदेतून सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला.
काय आहे योजना
मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली तर हा ५० हजारांचा लाभ पालकांना दिला जात आहे. दोन मुलींच्या पाठीवर ही शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजारांची रकम शासनाकडून दिली जाते. ही रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च केली जाते.
– जिल्हा परिषदेकडून इतरही योजना
– २०२३ हे वर्ष मल्टिमिलेट वर्ष म्हणून साजरे करताना कुपोषित बालकांना तृणधान्य युक्त पौष्टीक आहार पुरवला गेला. २२ हजारांपेक्षा अधिक बालकांना नावीन्यपूर्ण योजनेतून तृणधान्ययुक्त पौष्टिक बिस्किटांचा आहार देण्यात आला. तृणधान्य आहार देणारी नगर जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे.
– वर्षभरात ० ते ६ वर्ष वयोगटातील २ लाख ८६ हजार ९९४ पैकी १ लाख ३१ हजार ६०९ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यात ४३ बालकांना हृदयरोगाचे निदान झाले. त्यापैकी ४० बालकांवर हृदयरोगाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
– वर्षभरात १३३ नवीन अंगणवाडी उभारण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.