पारनेर बसस्थानकाचे खा. लंके यांच्या हस्ते भूमिपूजन ! 2 कोटी 66 लाख रूपयांचा निधी मंजुर, 40 वर्षानंतर उभी राहणार नवी वास्तू

Ahmednagarlive24
Published:

Ahilyanagar News : खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर मंजुर करण्यात आलेल्या पारनेर येथील बसस्थानकाचे रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खा. लंके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ व उपनगराध्यक्ष जयदा शेख यांनी दिली.

पारनेर बसस्थानक सन १९८५ मध्ये बांधून पुर्ण झाल्यानंतर ४० वर्षांच्या कालखंडानंतर बसस्थानकाची वास्तू उभी राहणार आहे. बसस्थानकाच्या स्वच्छता गृहाच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेत हे बसस्थानकाची वास्तू उभी राहणार असून हे बांधकाम झाल्यानंतर जुन्या बसस्थानकाचे निर्लेखन करण्यात येणार आहे.

त्यानंतर त्या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभे राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर  आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी पारनेर व सुपा बसस्थानकासाठी नवी इमारत तसेच व्यापारी संकुलासाठी पाठपुरावा सुरू केला होता.

कोरोना संकटामध्ये दोन वर्षे त्यात खंड पडला. सन २०२० पासून सन २०२४ पर्यंत खा. लंके यांनी या कामासाठी पत्रव्यवहार केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन या कामासाठी २ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजुर होऊन  राज्य परिवहन महामंडळाकडून निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येऊन १५ मार्च २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला.

पुढे काही तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याने हे काम सुरू होउ शकले नाही. त्यामुळे खा. नीलेश लंके यांनी दि.२१ जानेवारी २०२५ रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पत्रव्यवहार करून रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधले होते. कामाला विलंब झाल्याने २ कोटी ६६ लाख रूपये अंदाजपत्रक असलेल्या कामास मंजुर देण्यात आली. रविवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe