Ahmednagar News : महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत चांगला समन्वय ठेवून सरकार टिकविण्यासाठी होता होईल तेवढे प्रयत्न केलेले काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे आता पक्षातीलच अडचण उभी राहिली आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केले जात असताना विरोध का केला नाही, अशी विचारणा दिल्लीतून त्यांना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याला काँग्रेसचा सुरवातीपासूनच विरोध आहे. मात्र, यावेळी सरकार वाचविण्याचा एक भाग म्हणून राज्यातील काँग्रेसने विरोध सोडून मूक संमती दिल्याचे सांगण्यात येते. यावरून दिल्लीतील नेते नाराज झाले असून बैठकीत किंवा त्यानंतरही या निर्णयाला विरोध का केला नाही, अशी विचारणा थोरात यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर खुलासा मागविण्यात आला आहे.