Ahmednagar News : बदलत्या राजकीय परिस्थितीत जनतेने पक्षीय विचार न करता विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन जि.प. चे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पा. यांनी केले.
पारनेर तालुक्यातील डिकसळ येथे स्मशानभूमी सुशोभिकरण तसेच स्ट्रीट लाईट बसविणे, कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डिकसळ गावातील वेस अंगणवाडी इमारत, पाझरतलाव व रस्ते ही कामे करण्याचे भाग्य मिळाले असून, मा. आ. कै. वसंतराव झावरे यांनी डिकसळमध्ये अनेक विकासकामे केल्यामुळे या गावाशी आपला नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुभाषराव दुधाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सरपंच भाऊसाहेब चौधरी उपसरपंच आशाबाई येवले, चेअरमन किसन चौधरी, भगवान शिंदे, राधूजी ठाणगे, प्रितेश पानमंद, साहेबराव चौधरी, सोनू सूर्यवंशी
बबन परांडे, सोपान चौधरी, सुरेश निमसे, मच्छिद्र वाबळे, राहुल चौधरी, शुभम शिंदे, शिवाजी काकडे, बाबाजी येवले, मच्छिद्र काकडे, बाबाजी वाबळे, जयसिंग काकडे, शिवाजी काकडे, गणेश महाराज शिंदे, ग्रामसेवक ठेकेदार साहेबराव नरसाळे, राहुल तांबे, पत्रकार रामजी तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.