‘विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग’ ; रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या भडक्यावरून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल – डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. यातच घरगुती गॅसचे दर देखील वाढले आहे.

याच अनुषंगाने आता आमदार रोहित पवार यांनी केंद्रावर महागाईच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करता “विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग, अशा बातम्या आज बघायला मिळाल्या.

त्यामुळे ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली! आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा’, असं भाजपाच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!” असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आले, सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहे.

मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांत इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर मिश्किल शब्दात टीका केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News