अहमदनगर शेजारील या जिल्ह्यात उद्यापासून सायंकाळी ७ पर्यंतच पेट्रोल मिळणार ! जाणून घ्या काय आहे कारण ?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  औरंगाबाद जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंपावर सकाळी ८ पासून, सायंकाळी ७ पर्यंतच पेट्रोल मिळणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी लसीकरण प्रमाणपत्र न तपासता पेट्रोलपंपावर पेट्रोल देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी २ पेट्रोल पंप देखील सील केले होते.

या प्रकरणी औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आला होता, तर जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर देखील ही कारवाई करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe