थोरात कारखान्याकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद ! माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

Ahmednagar News : संगमनेर निळवंडे धरणातून डाव्या – कालव्यात सोडण्यात आलेले पाणी विनाअडथळा व गळती न होता सुरू राहावे, यासाठी थोरात साखर कारखान्याकडून कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी उपाययोजना केल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे.

मे महिन्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली – चाचणी घेतली. तेव्हा काही ठिकाणी पाण्याची गळती झाली.

ती – रोखण्यासाठी आता सोडण्यात – आलेल्या आवर्तनावेळी पाटबंधारे विभागाने उपाययोजना करीत प्लास्टिक कागद टाकला. प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने थोरात साखर कारखान्याच्या यंत्रणेने मोठी मदत केली.यामुळे आवर्तन जास्त दिवस सुरू राहण्यासाठी मदत होणार आहे.

मदतीबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व संचालकांचे लाभधारकांनी अभिनंदन केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली.

संकटातही कालव्यांची कामे सुरू ठेवली. कामासाठी मोठा निधी मिळवला. धरणग्रस्तांचे पुनर्वसनासह विविध प्रश्न मार्गी लावले. डाव्या कालव्यात पाणी सोडले, आता उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून लाभधारकांना पाणी द्या, अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे..