अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अकोल्यातील गर्दनीच्या दशरथ नारायण मडके याचा खून केल्याप्रकरणी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे.
दरम्यान कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींची हा धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती मिळते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील गर्दणी येथे देवजी देवराम खोडके याने जुलै महिन्यात कोंबड्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला असता दशरथ मडके
यांनी गर्दनी गावचे सरपंच यांना माहिती दिल्याचा राग मनात धरून आरोपी देवजी खोडके याने आरोपी कावजी मेंगाळ यास मदतीला घेऊन दशरथ मडके यांना बाजरीचे दाणे काढून झाल्यानंतर सोबत घेऊन गेले.
त्यानंतर आरोपींची अकोले येथे दारू विकत घेऊन प्रवरा नदी पात्राच्या छोट्या पुलावर दारू पीत असताना आरोपी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांनी दशरथ मडके याला पाण्यात ढकलून देऊन जीवे ठार मारले आहे.
याबाबतची फिर्याद मडकेची पत्नी अनुसया दशरथ मडके (वय 32, रा. गर्दणी) यांनी अकोले पोलिसांत दिल्यावरुन अकोले पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम