अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- जिल्हयामध्ये चैन स्नॅचिंगचे प्रकार मागील महिन्यात खूप वाढले होते. आता याच प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला योग्य त्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धूम स्टाईल ने चोरी करणाऱ्या टोळीचा तपास सुरु केला. या टीमला मिळालेल्या माहिती नुसार श्रीरामपूर येथील अशोक नगर भागातील विशाल बालाजी भोसले हा त्याच्या साथीदारांनी चैन स्नॅचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे.
अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथे जाऊन सापळा लावुन विशाल बालाजी भोसले, याला संशयावरून ताब्यात घेतले.
त्याची झडती मध्ये कापडी पिशवीत सोन्याचे दागिने व दोन सोन्याच्या लगड मिळुन आल्या त्याची किंमत सुमारे ७,६५,००० रुपये इतकी होती.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचे सोने हे वडाळामहादेव येथील संदिप दादाहरी काळे, नाशिक येथील लहु बबलु काळे योगेश ,सिताराम पाटेकर यांनी मिळून अहमदनगर शहर,
संगमनेर व नाशिक येथून मोटार सायकवरुन जाऊन तेथील महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढुन चोरुन आणले आहेत आता हे दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
त्या नुसार पोलिसांनी त्याच्या माहितीच्या आधारे त्याचे साथीदार संदिप दादाहरी काळे, (वय ३२ वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याचा वडाळा महादेव परिसरात त्यास ताब्यात घेतले
तसेच त्यांना या गुन्ह्यात मदत करणारे आणखीन दोन आरोपी यांचा शोध घेतला मात्र नाशिक येथील लहु बबलु काळे आणि योगेश सिताराम पाटेकर हे दोघे फरार झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम