‘या’ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यास १० हजाराची लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक संजय दुधाडे याने छेडखानीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यात अटक न करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारदारांना २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केल्याने लाचलुचत विभागाच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात १० हजार रुपयांची लाच घेतांना पोलीस नाईक दुधाडे यास रंगेहात पकडले.

लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई नंतर पोलीस नाईक दुधाडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचालुचत विभागाने केलेल्या कारवाईमुळे शहर पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe