अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-नगर शहरातील झेंडीगेट परिसरात कत्तल करण्यासाठी डांबलेल्या तीन गायींची कोतवाली पोलिसांनी सुटका केली आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्याचे पोकॉ. भारत मनोहर इंगळे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी रहीमउद्दीन मेहबुब कुरेशी (वय 25, रा. झेंडीगेट, अहमदनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील झेंडीगेट परिसरात आरोपी कुरेशी याने कत्तल करण्यासाठी जनावरे डांबली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.
त्यानंतर शिंदे यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यानुसार पोलिस कर्मचारी छापा टाकून 90 हजार रूपयांच्या तीन जर्शी गायींची सुटका केली. आरोपी कुरेशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोकॉ. पालवे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम