Ahmednagar Crime News : सोनई; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव- चांदा रोडवर सहा गावठी कट्टे ब १२ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत. त्यानुसार या आदेशाचे पालन केले जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली, की नेवासा तालुक्यात घोडेगाव चांदा रोडवर रेकॉर्डवरील आरोपी गावठी कट्टे विक्रीसाठी येणार आहे.
या माहितीवरून अनिल कटके यांनी पथक नेमले. या पथकाने रस्त्यावर शेतकरी, शेतमजूर असे वेशांतर करून सापळा रचला. दरम्यान गळ्यात एक सॅक असलेल्या संशयित इसमाला पळून जात असताना ताब्यात घेतले.
त्याने त्याचे नाव कयामुद्दीन ऊर्फ श्षैया कुतुबुद्दीन शेख (वव ३४, रा. कुकाणा, तालुका नेवासा) सांगितले. त्याच्या अंगझडतीत सहा गावठी बनावटीचे कट्टे व १२ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल संदिप कचरू पवार यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४३/२०२३ नुसार आर्म अँक्ट ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू थोरात पुढील तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापू फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, भीमराज खर्से, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर, योगेश सातपुते,
मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, अर्जुन बडे यांनी ही कारवाई केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध भिंगार कॅग्प पोलीस ठाण्यात ३४/२०१७ नुसार आमं अँक्ट ३/२५,७ व नेवासा पोलीस ठाण्यात ३८३/२०१८ नुसार भा.द.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ सह आर्म अँक्ट ३/२५ असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.