घरफोडी करणाऱ्याला अटक करून दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश

Published on -

Ahmednagar News : संगमनेर शहर व परिसरात घरफोडी करून दागिने लांबवणाऱ्याला अटक करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील रहेमतनगर येथील इमरान सलीम शेख यांच्या बंद घराचा कडी-कोंबडा तोडून अज्ञात चोरट्यांनी (दि. २) ऑक्टोबर रोजी सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरवस्तीत झालेल्या घरफोडी उडकीस आणण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर तपास पथकाने संशयीत इसम इम्रान चाँद शेख (वय २९, मुळ राहणार एकतानगर, संगमनेर ) हल्ली राहणार मजानपूरा ता मालेगाव व त्याचा अल्पवयीन साथीदार यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली.

सदरचा गुन्हा हा त्यांची महिला साथीदार मिनाज राजु शेख याच्यासोबत मिळुन केल्याचे चोरट्याने तपासात कबूल केले. आरोपी इम्रान चाँद शेख याला सदर गुन्ह्या अटक करण्यात आली. या आरोपीकडून सोने हस्तगत करण्यात आले असून त्यान इतर चोऱ्यांची कबुली दिली.

सदर कारवाई संगमनेर शहर पोलीर ठाण्यातील सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कर्मचारी भागा धिंदळे अजित कुम्हे, आत्माराम पवार, सचिन धनवड आकाश बहिरट यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe