अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर अर्बन बँकेच्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होत असल्याचे पाहायला मिळते आहे.
नुकतेच रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
राहाता तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमधील 15 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार हिरे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राहाता तालुक्यातील बाभळेश्वर-2, गोगलगाव-3, हसनापूर-2, लोहगाव-2, नांदुर्खी बु.- 2, लोणी खु.- 2, वाळकी- 2 अशा एकूण 15 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा असणार आहे
30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या दिवशी नामनिर्देशनपत्रे प्राप्त होतील व उमेदवारी अर्ज ही दाखल करता येईल.
7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल.
9 डिसेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे.
21 डिसेंबर, मंगळवार रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम