अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदार व कामावर नियंत्रण असणा-या शासकीय अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आरोग्य केंद्राच्या कामामध्ये दिरंगाई तसेच मुरुमाऐवजी मातीचा वापर, कामावर पाणी न मारणे, बोअरवेल नियोजीत बजेट मध्ये असताना बोअरवेल न घेणे, ठेकेदार कोणाचाही फोन उचलत नाही,
कामावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही अशा विविध तक्रारी यावेळी करण्यात आल्या. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतचा ठराव जेऊर ग्रामसभेत झाला असुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ग्रामसभा बंद होत्या. सुमारे दिड वर्षानंतर जेऊरची ग्रामसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. गेल्या निवडणुकीपासून गावातील राजकारण घडलेल्या घडामोडी वरुन ग्रामसभा खडाजंगी होईल असा ग्रामस्थांचा अंदाज होता. परंतु ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम