अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयाच्या आगप्रकरणी पोपटाराव पवार यांचा जबाब पोलिस नोंदवून घेणार आहेत. पुढील आठवड्यात पवार यांना पोलिस ठाण्यात बोलवण्याची शक्यता आहे.
दरम्यान जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला आग लागली होती. त्यामध्ये आतापर्यंत बारा जणांचा बळी गेला आहे.
ही आग लागली तेव्हा पवार तेथे उपस्थित होते. त्यांनीच अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क केला. आग अटोक्यात आणण्याच्या प्रत्यक्ष कामातही त्यांनी मदत केली.
त्यामुळे आगीच्या घटनेचे साक्षीदार म्हणून पवार यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे. आग प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यामध्ये चौघांना अटकही झाली आहे. आग लागल्यानंतर रुग्णांचे जीव वाचविण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी स्वत: फिर्याद देत डॉक्टर आणि परिचारिकांविरूद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या देखरेखाली डीवायएसपी मिटके तपास करीत आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
त्यावरून घटनाक्रम जुळविण्याचे आणि नेमके दोषी ठरविण्याचे काम सुरू आहे. यातून पोलिसांना महत्वपूर्ण माहिती आणि पुरावेही मिळत आहेत. आता याच प्रकरणात पवार यांचाही जबाब पोलिस नोंदविणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम