अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.(Sugar factory)
त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते आणि माजी आमदार कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल जगताप गटाकडून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
आज सोमवार दि. २० डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुक छाननी प्रक्रियेत १४८ उमेदवारांपैकी ३१ उमेदवारांचे उमेदवारी विविध कारणाने अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांनी सांगत कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असल्याची माहिती दिली.
माजी मंत्री आ.पाचपुते गटाकडून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी इतर मागासवर्गीय मतदार संघातून २ अर्ज तर सर्वसाधारण उस उत्पादक व्यकी मध्ये १ उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
यातील इतर मागासवर्गीय मतदार संघातील दोन्ही अर्ज कार्यक्षेत्रात रहिवासी नसल्याचे कारणाने बाद झाले तर सर्वसाधारण उस उत्पादक व्यकी मधील अर्ज उस न घातल्याच्या कारणामुळे अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम