Maharashtra News : राज्यातील सत्तासंघर्ष संबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकासंबधी भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे.
मात्र स्वतः लळीत यांनी स्वतःला त्यापासून दूर ठेवले आहे. आज या खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड,
न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळित यांनी त्यात स्वतःचा समावेश केला नाही.
माजी सरन्यायाधीश रमना निवृत्त होत असताना नवीन येणारे सरन्यायाधीश लळीत यांच्याकडून या प्रकरणी काय निर्णय घेतला जातो, याची बरीच चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात लळीत यांनी स्वतःला या पासून दूर ठेवल्याचे दिसते.