32 महिन्यांपासून सुरू होती वीज चोरी; महावितरणने केली कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  शहरातील बालिकाश्रम रोडवरील आदर्श इलाईट फेज- 1 येथे वीज मीटरमध्ये गडबड करत 32 महिन्यांपासून सुरू असलेली वीज चोरी महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने पकडली.

दोन हजार 689 युनिट चोरी करून 38 हजार 510 रूपयांची वीज चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अधिकारी प्रदीप राधेश्याम सावंत यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.

भारतीय विद्युत अधिनियम 2003 कलम 135 प्रमाणे रणजीत सत्रे या मालकासह वापरदार किशोर भुसाळ यांच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालक रणजीत सत्रे यांनी वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये कमी प्रमाणात होईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe