नगर क्रीडा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- काँग्रेस पक्षाच्या क्रीडा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तसे पत्र शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. गीते पाटील यांनी आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कराटे खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर डीसेबल प्रवर्गातून बॅडमिंटन खेळाडू म्हणून त्यांनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली आहेत. शिवराज स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून गीते पाटील यांनी आजवर अनेक खेळाडू घडविले असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरती उत्तम कामगिरी केलेली आहे.

महाराष्ट्र डिसेबल क्रिकेट संघातून त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. गीते पाटील यांच्या निवडीचे पत्र दिल्यानंतर काळे म्हणाले की, नगर शहरामध्ये विविध क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, युवावर्ग यांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू.

काँग्रेस पक्षाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून शहरातली क्रीडा प्रशिक्षकांना, क्रीडा शिक्षकांना क्रीडा क्षेत्रात भरीव यश मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वखाली क्रीडा विभागाच्या माध्यमातून मजबूत संघटन शहरात उभे करण्याचे काम आम्ही करू असे प्रतिपादन यावेळी गीते पाटील यांनी केले आहे.

गीते पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, दिप चव्हाण, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा आदींनी अभिनंदन केले आहे.

गीते पाटील यांच्या सत्कार प्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. चेतन रोहकले, शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय कुलट, विद्यार्थी नेते सुजित जगताप, मच्छिंद्र साळुंखे, नारायण कराळे, साहिल शेख, निखील गलांडे, ऋषिकेश चितळकर, अमित गुंड, आदेश जाधव आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून नियुक्तीपत्र देताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे.

यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. चेतन रोहकले, शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय कुलट, विद्यार्थी नेते सुजित जगताप, मच्छिंद्र साळुंखे, नारायण कराळे, साहिल शेख, निखील गलांडे, ऋषिकेश चितळकर, अमित गुंड, आदेश जाधव आदी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment