अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
त्यानुसार नगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच नगर शहरात देखील चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

या पावसामुळे पिकांचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे अहमदनगर, पुणे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
बळीराजा संकटात सापडला दिवसागणीक वातावरणात बदल होत आहे. ढगाळ वातावरण हटायला तयार नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.
गहू व कांद्यावर ढगाळ वातावरणाचा प्रादूर्भाव झाला असून महागड्या औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचबरोबर पेरलेल्या कांद्याची रोपेही बुरशीजन्य रोगामुळे नष्ट होत आहेत.
कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे वातावरणातील बदलामुळे नष्ट झाली आहेत. अशारीतीने आस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर वाढत्या खतांच्या किंमती,
महागडी किटकनाशके, डिझेलच्या किंमती वाढल्याने मशागतीचे वाढीव दर, वीज बिलांचा तगादा अशा संकटांचाही सामना शेतकरी करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम