अहमदनगर बाजारभाव : मेथी, कोथिंबीरीसह अनेक भाज्यांचे भाव गगनाला भिडले

Ahmednagar market prices

Ahmednagar market prices : कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी, कोथिंबीरीसह अनेक भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

परंतु अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शहरात भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाकले आहेत. पालेभाज्यासह इतर भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतातील भाजीपाल्यासह इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जोरदार पावसाने अनेक महामार्ग पाण्याखाली गेल्याने तसेच पुराने पुल व रस्त्याचे मोठे नुकसान झाले

त्यामुळे ग्रामीण भागाचा शहराशी असलेला संपर्क काही प्रमाणात तुटल्याने पालेभाज्या बाजारात पोहचत नसल्याने या पदार्थांचा तुटवडा निर्माण होत आहे. पर्यायाने आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस पडत होता तर काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईचा देखील भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला होता. मात्र मागील चार दिवसांपासून अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे जो थोड्याफार भाजीपाला होता, त्यातील बराच खराब झाला परिणामी भाजीपाल्याची आवक झपाट्याने कमी झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढल्याने ऐन गणेशोत्सवात सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो १००-८००, वांगी ५०० – ३५००, फ्लावर ५०० ३३००, कोबी ३००-१२००, काकडी ५००-२०००, गवार ३५००- ८०००, घोसाळे १२००-३०००, दोडका १००० २०००, कारले १०००-२०००, भेंडी १०००- ३०००, वाल ३५०० ५०००, घेवडा ४००० ५५००, तोंडुळे २०००-३०००, डिंगरी ४००० – ४०००, बटाटे १२०० १७००, लसूण १०,००० – २०,०००,

हिरवी मिरची १५००-४०००, शेवगा २०००-४५००, भु. शेंग २८०० ४२००, लिंबू २०००- ६०००, आर्द्रक ६०००-१४०००, गाजर २२०० २२००, दु. भोपळा ४००-१०००, मका कणसे ५०० – १०००, शि. मिरची १०००- २३००, मेथी २०००- २६००, कोथिंबीर १४०० – ४८००, पालक १००० २०००, करडी भाजी १००० २०००, शेपू भाजी १०००-१८००, मुळे १०००- २०००, चवळी १५००-३०००, बीट १००० २०००, डांगर ५०० -१०००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe