कैद्यांकडून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील उपकारागृहातील कैद्यांनी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. संगमनेर उपकारागृहात कैदी मोठ्याने आरडाओरडा करीत होते.

त्यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल गोडे व राजेंद्र बांधे यांनी कारागृहातील बरॅकसमोर जाऊन त्यांची विचारपूस केली असता, विशाल अशोक कोते, अजबे, पारधे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच या आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे याबाबत पोलीस नाईक राजेंद्र बांधे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe