अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Ahmednagarlive24 office
Published:

अहिल्यानगर : वाकोडी येथील साईदीप मैदानावर जिल्हास्तरीय बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा 23 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक सामना अटीतटीचा व शेवटच्या षटकापर्यंत चालला असून खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींचे मने जिंकली.

या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना डिफेन्स क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या मध्ये चुरशीचा झाला असून यामध्ये डिफेन्स क्रिकेट अकॅडमी ने विजेते पद मिळविले तसेच 14 वर्ष वयोगटाखाली अंतिम सामना एस.के क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट ॲकॅडमी मध्ये झाला असून एस.के क्रिकेट अकॅडमी ने विजेतेपद मिळविले

तसेच १६ वर्ष वयोगटाखालील अंतिम सामना हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी व एस.के क्रिकेट अकॅडमी मध्ये झाला असून हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी ने विजेतेपद मिळविले याचबरोबर 19 वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना प्रियदर्शनी क्रिकेट ॲकॅडमी आणि आर.एल क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झाला असून प्रियदर्शनी क्रिकेट ॲकॅडमी संघाने विजेते पट मिळविले असल्याची माहिती आयोजक कपिल पवार यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सी.ए अशोक पितळे. गौतम सुवर्ण पाठकी, आयोजक कपिल पवार,

नायब तहसिलदार विजय धोत्रे, सम्राट देशमुख, ज्ञानेश चव्हाण, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, अक्षय तोडमल, गौरव पितळे, राहुल पवार, रमेश सुपेकर, अरुण नाणेकर, संदीप पवार, उमेश ठाणगे, गौतम शिंगवी, अजय कविटकर, दिलीप पवार, प्रशांत अंतेपेलू,, सोमनाथ नजान, निखील पवार , सागर बनसोडे अदीसह क्रिकेट प्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की जिल्ह्यामध्ये नामवंत खेळाडू म्हणून कै.बाळासाहेब पवार यांची ओळख होती नगर जिल्ह्यासह शहरातील क्रिकेट खेळाडू साठी इलेव्हन संघाची स्थापना केली. त्यानंतर क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक सुरू केला आणि त्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्पर्धेचा दर्जा उंचविला आहे.

त्यातून चांगले खेळाडू निर्माण झाले कपिल पवार हा देखील चांगला खेळाडू असून त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने क्रिकेटचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे. वाडिया पार्क फक्त नावाला क्रीडा संकुल होते आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाचे मैदान निर्माण होणार आहे.पहिल्या टप्प्यात टर्फ विकेट व फर्ल्ड लाईट चे काम मार्गी लागणार आहे.

त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी क्रिकेटचे सामने खेळता येतील त्यातून नगरकर ही आनंद घेईल शहरात कधीही न झालेली कामे सुरू आहेत. सारसनगर परिसरामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे काम अंतिम टप्प्यात आले आहे याचबरोबर सावेडी उपनगरामधील गंगा उद्यान परिसरात खेळाची मैदाने निर्माण होत आहे.

आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध असून आपल्या आवडीच्या खेळामध्ये करिअर करावे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच विषयामध्ये काम सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

क्रिकेट खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गेल्या ८ वर्षापासून करत आहे. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील खेळाडू खेळत असून यावर्षी 12, 14, 16, 19 वर्षाखालील वयोगटातील 500 खेळाडूंनी भाग घेतला होता ही स्पर्धा पिंक लेदर बॉल वर खेळी असून हे सर्व सामने ऑनलाईन कोरिंग वर दाखवले असल्यामुळे सुमारे 45 हजार नागरिकांनी खेळाचा आनंद घेतला असल्याची माहिती निखील पवार यांनी दिली

बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील संघातील बेस्ट बॅट्समन प्रणय शिसवाल 139 धावा, बेस्ट बॉलर गुरुप्रसाद पांडे ७ विकेट, मॅन ऑफ द सिरीज इरफान सय्यद 129 धावा २ विकेट.

१६ वर्ष वयोगटातील सामन्यात मॅन ऑफ द मॅच अयान जावेद, बेस्ट बॅट्समन सय्यद अयान जावेद 230 धावा, बेस्ट बॉलर ओम गुसाळी १० विकेट, मॅन ऑफ द सिरीज शौर्य देशमुख 125 धावा ३ विकेट

14 वर्ष वयोगटातील सामन्यात  बेस्ट बॅट्समन अनिकेत शिनारे 116 धावा, बेस्ट बॉलर अरिंगण निंबाळकर ६ विकेट, मॅन ऑफ द सिरीज सय्यद मुसेब 102 धावा २ विकेट

१२ वर्ष वयोगटातील सामन्यात बेस्ट बॅट्समन अंश राऊत 73 धावा, बेस्ट बॉलर तेजस अंतापल्लू ५ विकेट, मॅन ऑफ द सिरीज कार्तिक बेरड 152 धावा ३ विकेट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe