विनापरवानगी मिरवणूक पडली भारी…अनेकांवर झाले गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता काही तरुणांनी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 20 ते 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून विनामास्क करोना आजाराच्या अनुषंगाने करोना आजार पसरू शकतो

हे त्यांना माहीत असताना देखील त्यांनी बेजबाबदारपणे वर्तन करून मिरवणुकीस कोणतीही पूर्वपरवानगी न घेता फकीरवाडा कॉलेज रोड,

सिद्धार्थनगर, अंडरग्राउंड ब्रीज, नेवासा ते संगमनेर रोडवर हॉटेल राधिकासमोर येऊन मिरवणूक पुन्हा फकीरवाडा, वॉर्ड नं. 1 श्रीरामपूर या मार्गाने मिरवणूक काढली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजू आसाराम महेर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तौफीक आयूब पठाण (वय 28), अब्दुल अब्बास खान (वय 33),

शोएब उस्मान सय्यद (वय 35), अरबाज मस्तान शेख (वय 20), अजीम अमीर मिर्झा (वय 25) सर्व रा. फकीरवाडा, वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर व इतर 10 ते 15 जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe