नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक प्रचारास मनाई जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published on -

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करतांना आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दि. 13 मार्च ते 13 मे, 2024 या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहे.

लोकसभा निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. त

सेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे,वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News