Ahmednagar News : शहरातील वाडीया पार्क येथील मोबाईल दुकानामध्ये अॅपल कंपनीच्या नावाचा वापर करुन या कंपनीचा लोगो असलेली बनावट अॅक्सेसरी विक्री होत असल्यात या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेवून त्यांना याबाबत माहिती दिली.
त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि. तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, मनोहर गोसावी,
रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे आदींना याबाबत कारवाईचे आदेश दिले.
पथकाने वाडीया पार्क कॉम्प्लेक्समध्ये जावुन खात्री करता सदर ठिकाणी माँ चामुण्डा मोबाईल कवर, ग्लास होलसेल विक्रेता या दुकानामध्ये हिमताराम वालारामजी चौधरी (रा. ओम कॉलनी, नानाजी नगर, रामदेव बाबा मंदिराजवळ, औसरकर मळा), हा १३,५०,९६७ रुपये किमतीचा, व्हाईस टेलिकॉम मोबाईल अॅक्सेसरीज या दुकानामध्ये धनराज चंद्रकांत डेंगळे (रा. आनंदनगर, अहमदनगर),
रुपेश सुराण पुर्ण नांव माहित नाही. (रा.लातुर, हल्ली रा. आनंदनगर, अहमदनगर (पसार) हे १४, ८२,९०० रुपये किमतीचा, शिवसहारा मोबाईल अॅक्सेसरीज, स्पेअर पार्ट, अॅण्ड टुल्स होलसेल या दुकानामध्ये संपत ममताजी पालवे (रा.मिरी, ता. पाथर्डी) हा ३,०६,८३० रुपये किमतीचा मुद्देमाल, नवकार अॅक्सेसरीज मोबाईल रिपेअरींग अॅण्ड ट्रेनिंग सेंटर या दुकानामध्ये (साहिल विजय शिंदे रा. ताराबाग कॉलनी, केडगांव), शुभम शिवाजी तोगे (रा. मिरी. ता.पाथर्डी ).
प्रतिक सुभाष गुगळे (रा . मिरी ता. पाथर्डी, हल्ली रा. सारसनगर (पसार) हे ५,३५,०९९ रुपये किमतीचा, आनंद भक्ती मोबाईल अॅक्सेसरीज अॅण्ड होलसेल्स या दुकानामध्ये अजय रसिकलाल बाफना (रा. भवानीनगर, मार्केटयार्ड शेजारी) हा ५९,७०० रुपये किमतीचा,
जय श्री कृष्ण मोबाईल होलसेल मोबाईल अॅक्सेसरीज या दुकानामध्ये (यश किशोर खत्ती रा. पारशाखुंट, हलवाई गल्ली) हा २६,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांचेकडे अॅपल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसतांना या कंपनीच्या लोगोचा वापर करुन विविध वस्तू विक्री करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या ७ इसमांकडुन ३७ लाख ६२ हजार ३६९ रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा बनावट मुद्देमाल जप्त करुन त्यांच्याविरुध्द कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.