अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- महालोक अदालतमध्ये शहरातील मालमत्ताधारकांनी एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा केला आहे. दरम्यान महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.
महालोक अदालतमध्ये मालमत्ता कराची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यासाठी २० हजारांपेक्षा जास्त मालमत्ता कर असलेल्या १६ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.
दरम्यान महानगरपालिकेकडून शास्तीवर ७५ टक्के आणि चालू बिलावर ८ टक्के सूट देण्यात आली होती. फक्त एक दिवस शास्तीमाफी दिली असल्याने
१०५० प्रकरणांत एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला. या सवलतीबाबत नागरिकांना विविध माध्यमांद्वारे आवाहन करण्यात आले होते. रोख भरणा, चेकद्वारे, ऑनलाइन आणि मोबाइल ॲपद्वारे भरणा करण्यासाठी पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम