Ahmednagar News : प्रपोझ केलं, तिने नकार दिला..१३ वर्षानंतर ती भेटताच बाळाला मारण्याची धमकी देत अत्याचार

Published on -

Ahmednagar News : विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतात. आता अहमदनगरमधून काळीज हेलवणारी घटना समोर आली आहे. माणूस खरोखर माणुसकी हरवत चालला आहे का? असा प्रश्न पडावा अशी ही घटना. 2008-09 मध्ये त्याने तिला प्रेमासाठी प्रपोझ केला होता.

फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व नंतर तिचा 2010 मध्ये विवाह झाला. 13 वर्षानंतर ती समोर येताच तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना गुरूवारी (दि.28 डिसेंबर) दुपारी कायनेटीक चौकातील एका लॉजवर घडली. अमीर हसन शेख (रा.शिक्रापूर ता. शिरूर, जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित विवाहितेने शनिवारी (दि. 30) दिलेल्या फिर्यादीवरून अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी : फिर्यादीची अमीर शेख सोबत ओळख होती. या ओळखीतून त्याने फिर्यादीला 2008-09 मध्ये प्रपोझ केला होता. परंतु फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व नंतर फिर्यादीचे सन 2010 मध्ये लग्न झाले.

त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अमीर व फिर्यादी दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर कधीमधी फोनवर बोलणे झाले. अमीरने फिर्यादीला बुधवारी (दि. 27) फोन करून गुरूवारी (दि. 28) दुपारी नगर शहरातील पुणे बस स्थानक येथे भेटण्याठी बोलविले होते.

फिर्यादी त्यांच्या अल्पवयीन (वय 6) मुलाला घेऊन गुरूवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या. त्यानंतर अमीर याने फिर्यादीला कायनेटीक चौकातील लॉजवर घेऊन जात मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe